खानापूर
खानापुरात उद्या महिलांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन

खानापूर: येथील मऱ्याम्मा मंदिरात विश्वभारती कला आणि क्रीडा संघटनेतर्फे मंगळवार, 28 जानेवारी रोजी हळदी-कुंकू आणि तिळगुळ समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा समारंभ सायंकाळी 6 वाजता सुरू होणार आहे.
या कार्यक्रमात महिलांसाठी मातृभाषा आणि संस्कृतीचे जतन याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच, लहान मुलांमध्ये शिक्षणाबरोबर खेळ, व्यायाम आणि योग याविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी विशेष मार्गदर्शन दिले जाणार आहे.
सर्व महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल देसाई (माजी सैनिक) यांनी केले आहे.
