खानापूर

विद्यार्थ्यांना चांगल्या-वाईट स्पर्शाचे ज्ञान देण्यासाठी इन्नरव्हील क्लबचा पुढाकार

इन्नरव्हील क्लबतर्फे चिरमुरकर गल्ली मराठी शाळेत स्पर्शज्ञान जागृती कार्यक्रमाचे आयोजन

खानापूर: इन्नरव्हील क्लबतर्फे चिरमुरकर गल्ली हायर प्राथमिक मराठी मुला-मुलींच्या शाळेत स्पर्शज्ञानाबद्दल जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका एस. टी. सायनेकर होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून क्लबच्या अध्यक्षा प्रा. शरयू कदम आणि समृद्धी सुळकर यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या स्वागतगीत व ईशस्तवनाने झाली. यानंतर प्रा. शरयू कदम यांनी क्लबच्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची माहिती देत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सहशिक्षक एच. एल. करंबळकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.

प्रमुख वक्त्या दीप्ती बडदाली यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या व वाईट स्पर्शातील फरक समजावून सांगताना प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना शोषणसंदर्भातील वाढत्या घटनांविषयी जागरूक करत संभाव्य धोक्यांपासून स्वत:चे संरक्षण कसे करावे, याबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमादरम्यान क्लबतर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून त्यांचे कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमास इन्नरव्हील क्लबचे सर्व सदस्य, शाळेतील शिक्षक टी. बी. मोरे, व्ही. एफ. सावंत, जे. पी. पाटील, स्नेहल चौगुले, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते