बातम्या

गोव्यातील पायी दिंडीचे शिरोली येथे स्वागत

खानापूर: दरवर्षी प्रमाणे शिरोली येथील जागृत हनुमान मंदिरात दक्षिण गोवा येथील पायी वारी दिंडीचे स्वागत व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

पावसात देखील भजनात रंगलेले वारकरी

आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला आषाढी एकादशीला ‘पाऊले चालती पंढरीची वाट….’ असं म्हणत दरवर्षी लाखो वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी तन-मन-धन अर्पण करत पायी पंढरपूरची वाट चालत असतात. अशीच एक पायी दिंडी दक्षिण गोव्याहून शिरोली येथे पोहचली असून दिंडीचे गावकऱ्यांतर्फे मनोभावे स्वागत व सेवा करण्यात आली.

शिरोली गावातील नागरिक व तरुण दरवर्षी स्वखर्चाने या दिंड्यांचे मनोभावे स्वागत पूजन भजन करतात व मिळून मिसळून त्यांची राहण्याची व खाण्याची सोय करतात. त्याच प्रमाणे गावात अवघी पंढरी अवतरते सर्व गावकरी भजनात भाग घेत दिंडीला पुढे पाठवतात.

khanapur shiroli

khanapur taluka news

बेळगांव न्युज

खानापूर न्युज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते