खानापूर

गर्लगुंजी विभागीय क्रीडा स्पर्धेत गणेबैल हायस्कूलचे घवघवीत यश

खानापूर:  तालुका विभागीय माध्यमिक शाळा क्रीडा स्पर्धा नुकत्याच गुरुवर्य शामराव देसाई हायस्कूल इदलहोंड येथे संपन्न झाल्या, त्यामध्ये श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचलित गणेबैल हायस्कूलच्या स्पर्धकांनी विविध खेळ प्रकारात घवघवीत यश संपादन केले.

मुलांचा थ्रोबॉल, हॉलीबॉल द्वितीय, 4×100 मीटर रिले, 4×400 मीटर रिले द्वितीय, वैयक्तिक मध्ये प्रसाद निलजकर 100 मीटर धावणे प्रथम, 800 मीटर धावणे प्रथम, भालाफेक द्वितीय, चैतन्य मजगावकर उंच उडी प्रथम, लांब उडी प्रथम, अडथळा प्रथम, रोहन निडगलकर, लांब उडी, गोळा फेक, द्वितीय, प्रथमेश गावडे पाच किलोमीटर चालणे प्रथम, साईराज गुरव व यश सुर्वे योगा प्रथम, पृथ्वीराज पवार व गणेश चोपडे बुद्धिबळ प्रथम, प्रतीक सायनेकर 55 किलो कुस्ती प्रथम, विवेक बाचोळकर 60 किलो प्रथम, ओम मोटर 48 किलो कुस्ती प्रथम, मुलींचा कबड्डी संघ प्रथम, थ्रो बॉल द्वितीय, 4×100 मीटर रिले प्रथम, वैयक्तिक मध्ये भाग्यश्री धबाले अडथळे मध्ये प्रथम, रेणुका गुरव गोळा फेक, थाळीफेक द्वितीय, इंद्रायणी गुरव भालाफेक द्वितीय, विजयालक्ष्मी 800 मीटर तृतीय, राधिका गुरव, माहेश्वरी येरमाळकर बुद्धिबळ प्रथम, रेखा ठोंबरे 51 किलो कुस्ती प्रथम, सृष्टी येळूरकर 45 किलो कुस्ती प्रथम, नंदिनी गुरव 43 किलो प्रथम, लता गुंजीकर 41 किलो कुस्ती प्रथम,

यशस्वी क्रीडापट्टूना मुख्याध्यापक आर. बी. पाटील यांचे प्रोत्साहन आणि क्रीडा शिक्षक के.आर. पाटील यांचे मार्गदर्शन तर संस्थापक वाय.एन.मजुकर व सेक्रेटरी प्रसाद मजुकर यांचे सहकार्य लाभले. या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते