लहान मुलांमध्ये क्रिकेट खेळताना वाद, एकावर चाकूने हल्ला
पोलिसांकडून बंदोबस
बेळगाव : आळवण गल्ली बेळगांव येथे लहान मुलांमध्ये क्रिकेट खेळताना भांडण होऊन एकावर भांडण चाकूने हल्ला झाल्याची घटना काल गुरुवारी २३ मे रोजी घडली.
लहान मुलांकडे झालेले हे भांडण रात्री साडेसात वाजता शहापूर बेळगांव येथील आळवण गल्ली येथे क्रिकेट खेळताना झाले. एका गटातील मुलाने दुसऱ्या गटातील मुलावर चाकू हल्ला केला तर दुसरा गटातील मोठे देखील तलवारी घेऊन बाहेर पडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. परत घटना भिन्न धर्माच्या मुलांमधे घडली असल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार: घटना धर्मीय असल्याने दुसरा गटही आक्रमक होत तलवारी घेऊन बाहेर पडल्याचे समजल्याने सांगितले. परंतु, पोलिसांनी तसे काही घडले नसल्याचे सांगितले. या प्रकारामुळे आळवण गल्ली परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
घटनेची माहिती मिळताच मार्केटचे एसीपी सोमेगौडा जी. यू., शहापूरचे निरीक्षक चंद्रशेखर तिगडी व इतर पोलीस उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत बंदोबस्त ठेवण्यात आला होता.