खानापूर

खानापूर आमदार शाळेत विद्यार्थ्यांना वर्गात घेण्यास नकार – शिक्षिकेची कानउघाडणी

खानापूर: येथील आमदार कन्नड प्राथमिक शाळेत दोन मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश नाकारल्याच्या प्रकरणी गटशिक्षणाधिकारी पी. रामाप्पा यांनी संबंधित वर्गशिक्षिकेची कानउघाडणी केली. त्यांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे दोन्ही विद्यार्थ्यांना अखेर वर्गात प्रवेश मिळाला असून या प्रकरणावर पडदा पडला आहे.

प्रवेशासाठी आठ दिवसांची धावपळ

स्टेशन रोडवरील शाहूनगर वसाहतीत राहणाऱ्या राघव सोनटक्के यांचा मुलगा प्रज्ज्वल सोनटक्के आणि वैष्णवी कुडाळे या दोन विद्यार्थ्यांना गेल्या आठवड्याभरापासून शाळेत प्रवेश मिळत नव्हता. पालकांनी अखेर त्यांचा कन्नड बोलणारा नातेवाईक सोबत घेत शाळेत जाऊन प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केली. मात्र त्यासाठी दिवसभर ताटकळत ठेवण्यात आले आणि प्रवेश संध्याकाळी चारनंतर देण्यात आला.

वर्गशिक्षिकेचा वर्गात घेण्यास स्पष्ट नकार

प्रवेशानंतर सोमवारी जेव्हा पालक विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी गेले, तेव्हा वर्गशिक्षिकेने “माझ्या वर्गात नको, दुसऱ्या वर्गात बसवा” असे सांगून विद्यार्थ्यांना वर्गात घेण्यास नकार दिला. त्यानंतर सलग चार दिवस पालकांनी विनंती केली तरी शिक्षिकेचा अडून बसण्याचा पवित्रा कायम राहिला.

पालकांची तक्रार, गटशिक्षणाधिकाऱ्यांची कारवाई

या प्रकारामुळे त्रस्त पालकांनी शुक्रवारी दुपारी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली. तक्रारीची गांभीर्याने दखल घेत गटशिक्षणाधिकारी पी. रामाप्पा यांनी शाळेला भेट दिली आणि संबंधित शिक्षिकेला चांगलेच फटकारले. त्यांच्या आदेशानंतर दोन्ही विद्यार्थ्यांना लगेचच वर्गात घेण्यात आले.अखेरविद्यार्थांना वर्गात प्रवेश मिळाला असून या प्रकरणावर पडदा पडला आहे.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या