बेळगाव-गोवा महामार्गावर अपघात; कार खड्ड्यात कोसळली
सूचना: ग्रूप 30 फुल्ल झाल्याने तुम्ही बाहेरील लिंक वर क्लिक करून जॉईन होऊ शकणार नाही तरी खालील इमेज वर क्लिक करून 👇 ग्रूप 31 जॉईन करा

रामनगर: बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अस्टोली पुलाजवळ केरळच्या एका कुटुंबाचा अपघात झाला. हे कुटुंब गोव्यात क्रिसमस साजरा करून आपल्या गावी परतत होते. प्रवासादरम्यान गाडी चालवताना रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे चालकाने गाडी वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु गाडी रस्त्याच्या बाहेर जाऊन पुलाशेजारील खड्ड्यात कोसळली.

या गाडीमध्ये चार व्यक्ती होत्या, ज्यामध्ये चालक, एक महिला, आणि दोन लहान मुले होती. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही, आणि सर्व जण बचावले.

घटनास्थळी उपस्थित लोकांनी तत्काळ मदतकार्य केले. अपघाताचे कारण राष्ट्रीय महामार्गावरील खराब रस्ते आणि खड्डे असल्याचे स्थानिकांनी सांगितले. अनेक दिवसांपासून रखडलेल्या बेळगांव पणजी महामार्ग अजून किती अपघात घडवणार याची प्रवाशांना चिंता लागली आहे.
