श्री. भावकेश्वरी सैनिक संघ कुप्पटगिरी यांच्यातर्फे सैन्य दलात निवड झालेल्या मुलींचा सत्कार
कुप्पटगिरी: येथे श्री. भावकेश्वरी सैनिक संघाच्या वतीने सैन्य दलात दाखल झालेल्या दोन युवतींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये कुमारी श्रुती बळवंत पाटील (CISE – Central Industrial Security Force) आणि कुमारी प्रनाली बबन डेळेकर गणेबैल (ITBP – Indo-Tibetan Border Police) यांचा समावेश होता.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. कॅप्टन संजीव रा. पाटील, माजी कॅप्टन मोहन निलजकर, ग्रामपंचायत सदस्य कु. पद्मश्री म. पाटील, सुभेदार सुनील भा. पाटील, हवालदार प्रताप बाबाजी पाटील, दुदापा बाबाजी पाटील, गुरुनाथ बुवाजी, भाऊ रवळु पाटील आजी माजी सैनिक यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यात उपस्थित सैनिकांनी त्यांच्या योगदानाबद्दल तरुणाईला प्रेरित करत देशसेवेचा आदर्श घालून दिला. उपस्थित मान्यवरांनी सत्कारमूर्तींचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
