क्राईम

मतीमंद तरुणीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न, आरोपीला अटक

काकती: मतिमंद मुलीवर एका व्यक्तीने बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बेळगावच्या काकती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात घडल्याने तणावाचे  वातावरण निर्माण झाले होते.

बुधवारी रात्री सदर घटना बेळगाव तालुक्यातील काकती पोलीस स्थानक व्याप्तीत घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार घरात कुणी नसलेले पाहून असून आई-वडील शेतावर गेले असताना संशयित आरोपी तरुणाने घरात घुसून मती मंद तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असता



घरात घुसलेल्या त्या युवकाला मती मंद मुलीच्या काकांनी पकडुन मारहाण करायला सुरुवात केली त्यावेळी तरुणीच्या काकाच्या हातातून आरोपीने निसटून सिनेमा स्टाईल पद्धतीने पलायन केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

पिडीत मुलीसह तात्काळ काकती पोलीस ठाण्यात आलेले आई-वडील, नातेवाईकांनी पोलिसांना या घटने बाबत माहिती दिली. याची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण विभागाच्या पोलिसांनी शोध घेऊन आरोपीला अटक केली.

डीसीपी स्नेहा यांनी बेळगाव येथील काकती पोलीस ठाण्याला भेट देऊन नातेवाईकांकडुन माहिती घेतली. काकती पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.घटनास्थळी डी सी पी रोहन जगदीश यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते