बैलूर प्राथमिक शाळेत डॉ. ऋषिकेश राजगोळकर यांचे आरोग्यविषयक मार्गदर्शन
खानापूर: बैलूर येथील सरकारी मराठी मॉडेल शाळेत माजी विद्यार्थी आणि सर बी व्ही व्ही एस होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, बागलकोटचे विद्यार्थी डॉ. ऋषिकेश रवळू राजगोळकर यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक सखोल मार्गदर्शन केले. हा उपक्रम शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष श्री. सिद्धेश्वर झांजरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. एम. एस. चौगुले यांच्या प्रास्ताविक आणि स्वागताने झाली. डॉ. ऋषिकेश राजगोळकर यांनी विद्यार्थ्यांना समतोल आहाराचे महत्त्व, फळे व भाज्यांचे आरोग्यासाठी असलेले फायदे, हृदय व किडनीची निगा राखण्याचे उपाय, मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम, तसेच प्राथमिक उपचारांची माहिती दिली.
कार्यक्रमाला शाळा सुधारणा समितीचे सदस्य श्री. वैजू गावडे, श्री. विद्याधर गोवेकर, श्री. ज्ञानेश्वर चौगुले, सौ. सुषमा होनगेकर, सौ. लक्ष्मी हाजगोळकर, माधुरी कनगुटकर, सौ. सुनीता गुरव, सौ. लक्ष्मी तुडयेकर यांसह शिक्षक वृंद एस. व्ही. कांबळे, पी. व्ही. पाटील, आर. डी. चिगरे, एस. बी. रजपूत, विद्या नाकाडी, साक्षी सोनोलकर, स्नेहल चांदिलकर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन श्रीमती एस. व्ही. कांबळे यांनी केले.
