सेवानिवृत्त जवानांसाठी पुन्हा सेवेत येण्याची सुवर्णसंधी!

बेळगाव – मराठा लाईट इन्फंट्रीच्या सेवानिवृत्त जवानांसाठी मोठी संधी चालून आली आहे. द मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे 5 मे ते 8 मे 2025 या कालावधीत डीएससी (Defence Security Corps) भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ही भरती सोल्जर जनरल ड्युटी आणि सोल्जर क्लार्क (एसडी) या पदांसाठी होणार आहे.
भरतीसाठी काही अटी ठरवण्यात आल्या आहेत. सोल्जर जनरल ड्युटी या पदासाठी उमेदवाराने मागील सेवेतील सेवानिवृत्ती 2 वर्षांपेक्षा जुनी नसावी, तर सोल्जर क्लार्क (एसडी) पदासाठी ती 5 वर्षांपेक्षा जुनी नसावी. वयोमर्यादा अनुक्रमे 46 वर्षे (जनरल ड्युटी) आणि 48 वर्षे (क्लार्क एसडी) इतकी ठेवण्यात आली आहे.
पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह 5 मे 2025 रोजी सकाळी 7 वाजता द मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे हजर राहावे, असे आवाहन एमएलआयआरसीचे लेफ्टनंट कर्नल/मेजर, जेसीओ-1 (प्रशिक्षण) यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
