खानापूर

खानापूर येथे 29 रोजी 10 किमी धावण्याची स्पर्धा,1.25 लाखापर्यंतची रोख बक्षिसे

खानापूर:  ‘रन फॉर नेचर’ या थीमसह खानापुर ईलाईट अकॅडमी यांच्या वतीने 10 किमी धावण्याची स्पर्धा आयोजित केली आहे.  या स्पर्धेत भारत भरातून 600 हून अधिक धावपटू सहभागी होत असून सर्व वयोगटातील धावपटू आणि काही ज्येष्ठ नागरिकही सहभागी होत आहेत.

या शर्यतीत 10 किमी, 5 किमी आणि 3 किमी अशा 3 श्रेणी आहेत. सर्व धावपटूंची वेळ RFID टाइमिंग चिपद्वारे कॅप्चर केली जाणार आहे. शर्यतीचा प्रारंभ आणि शेवट शांतिनिकेतन पब्लिक स्कूल जवळील नागन्ना होसमनी कन्व्हेन्शन हॉल येथे होईल. शर्यतीचा मार्ग निसर्गरम्य खानापूर पारीश्वाड रोडने आहे . विविध वयोगटातील विजेत्यांना 1.25 लाख रु. ची आकर्षक रोख बक्षिसे आहेत.|
सर्व धावपटूंना पदके, शर्यतीनंतर नाश्ता,  टीशर्ट आणि ई- टाइमिंग प्रमाणपत्र दिले जाईल.

www.eliterunning.in वर नोंदणी करण्याची अंतिम तारीख 26 सप्टेंबर 2024 आहे. अधिक माहितीसाठी    8283875150, 8770190687 या नंबरवर संपर्क साधावा .

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते