क्राईम

भयानक अपघात: जांबोटी रोडवरील कुंभार नाल्याजवळ दोन ठार

खानापूर: शनया गार्डन जवळील कुंभार नाल्याजवळ मध्यरात्री घडलेल्या घटनेत मच्छे‌ बेळगाव येथील दोन तरुण ठार तर एक तरुण जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार खानापूर येथील एका हॉटेल मध्ये जेवण करून परतत असताना भरधाव कार कुंभार नाल्याला आदळल्याने कारचे तुकडे होऊन या मध्ये शंकर (मिथुन) मोहन गोमानाचे (वय 25) व आशिष मोहन पाटील (वय 26) मुळगाव हत्तरवाड खानापूर, सध्या राहणार मच्छे यांचा मृत्यू झाला आहे.  तसेच निकेश जयवंत पवार हा तो गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. जखमीला खानापूर दवाखान्यातील दाखल केले असून उपचार चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते