खानापूर

नागरगाळी जवळ अपघात, युवक ठार

खानापूर: रामनगर-धारवाड मार्गावरील नागरगाळी जवळ धारवाड येथून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट कार क्र. जीए 05 डी 7818 तसेच गोवा येथून पर्यटन करून तामिळनाडूच्या दिशेने जाणारी कार क्र. TS 03 इजी
1701 या दोन्ही वाहनांची समोरा- समोर टक्कर झाली.


या अपघातात गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट कारमधील अमीर बेडगिरी (वय 28 रा. मडगाव, गोवा) हा गंभीर जखमी झाला.तातडीने त्याला रामनगर सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु त्याचा मृत्यू झाला तर गोवा येथून पर्यटन करून जाणाऱ्या तीन प्रवाशांमधील राजशेखर रेड्डी (वय 24 रा. कित्तूर, तामिळनाडू) हासुद्धा जखमी झाल्याने त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.  सदर घटनेची नोंद लोंढा पोलिसांत झाली आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते