खानापूर

कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाय घसरून पडल्याने मृत्यू


खादरवाडी : धरणात बुडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी अकाराच्या सुमारास खादरवाडीत घडली. अनिता ऊर्फ सुनीता सोमनाथ पाटील (वय 50, रा. खादरवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे.


मिळालेल्या माहतीनुसार अनिता कपडे धुण्यासाठी धरणाकडे गेल्या होत्या. त्यांचा पाय घसरल्याने त्या पडल्याचे सांगण्यात येते. येथे जनावरे चारणाऱ्या तरुणांना याबाबत संशय आला.

त्यांनी ही माहिती गावातील लोकांना कळवली. वडगाव पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी मृत महिलेचा भाऊ रघुनाथ घाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वडगाव पोलिसांत नोंद झाली आहे.

जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. उपनिरीक्षक लकाप्पा जोडट्टी तपास करीत आहेत.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते