खानापूर

चोर्ला घाट जंगलात पट्टेरी वाघीन तीन बछड्यांसह ?

खानापूर: म्हादई अभयारण्यात चोर्ला घाटातील जंगलात वन खात्याने बसवलेल्या कॅमेर्‍यात पट्टेरी वाघीण आपल्या तीन बछड्यांसह द़ृष्टीस पडल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केली आहे. रात्रीच्यावेळी ट्रक चालकांनी गोव्यातून कर्नाटककडे जाताना चोर्लाघाटात पट्टेरी वाघ पाहिल्याची चर्चा आहे.


मात्र, वन खात्याने ‘ती’ वाघीण व तिचे बछडे हे म्हादई अभयारण्यातील नाहीत. सदरचा व्हिडीओ जुना असल्याचा दावा केला आहे.
याबाबत ‘म्हादर्ई बचाव अभियान’चे संयोजक व पर्यावरणप्रेमी प्रा. राजेंद्र केरकर यांनी म्हटले, की वन खात्याच्या कॅमेर्‍यात दिसलेली वाघीण ही देशभरातील कोणत्याही डेटाबेसमध्ये नोंद नसलेली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने वाघांच्या संरक्षणासाठी व्याघ्र क्षेत्र संरक्षित करण्याची शिफारस गोवा सरकारला केली आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते