खानापूर

खानापूर तहसीलदार ऑफिसमध्ये चोरी, चोर सीसीटिव्हीत कैद

तलाठ्याचा मोबाईल, रोख रकमेसह पर्सची चोरी


खानापूर : बुधवारी (दि. 19) भर दिवसा कार्यालयातूनच तलाठी महिलेची पर्स, मोबाईल आणि १० हजार रुपये लांबविल्याचा प्रकार घडला. बस स्थानक, बाजारपेठ आणि कमी वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या घरांनंतर आता चोरट्यांनी थेट तहसील कार्यालयापर्यंत मजल मारली आहे.  या घटनेमुळे चोरांचे धाडस वाढले असल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.


नंदगड भागाच्या तलाठी विजयालक्ष्मी चापगाव कार्यालयीन कामानिमित्त तहसीलदार कार्यालयात आल्या होत्या. पहिल्या मजल्यावर असलेल्या निवडणूक विभागात टेबलवर पर्स ठेवून त्या काम करत होत्या. यावेळी काही कामानिमित्त त्या बाजूलाच असलेल्या भूमी अभिलेख विभागात गेल्या असताना अज्ञात चोरट्याने त्यांची पर्स घेऊन पोबारा केला.

khanapur tahshildar office cctv footage

पर्समध्ये दोन सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल, दहा हजार रोख, महत्त्वाची सरकारी कागदपत्रे होती. 55 वयोगटातील चोरट्याने खिडकीतून हात घालून पर्स लांबविल्याचे दिसून येत आहे. त्याच्या हातात भगव्या रंगाची कापडी पिशवी होती. त्या पिशवीत पर्स टाकून त्याने पोबारा केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते