खानापूर

खानापूर मलप्रभा क्रीडांगणावर रविवारी कुस्तीचा महासंग्राम!

पृथ्वीराज मोहोळ आणि सोनू हरियाणामधील मुख्य कुस्ती सामना

खानापूर: तालुका कुस्तीगीर संघटनेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. १८ रोजी दुपारी ३ वाजता जांबोटी क्रॉसजवळील मलप्रभा क्रीडांगण, खानापूर येथे हा कुस्ती महोत्सव रंगणार आहे.

या कुस्ती मैदानातील प्रमुख आकर्षण म्हणजे महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध भारत केसरी सोनू कुमार (हरियाणा) यांच्यातील पहिली क्रमांकाची कुस्ती. तसेच दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी शुभम सिदनाळे विरुद्ध हिमाचल केसरी पवन कुमार, आणि तिसऱ्या क्रमांकाची डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी संदीप मोटे यांच्यात होणार आहे.

या व्यतिरिक्त चौथ्या क्रमांकापासून पुढील कुस्त्याही लक्षवेधी ठरणार आहेत. काही महत्वाच्या कुस्त्या पुढीलप्रमाणे:

  • शिवय्या पुजारी वि. ओम माने (कोल्हापूर)
  • शिवा दड्डी वि. सुनील करवते
  • प्रेम कंग्राळी वि. संजू इंगळगी
  • विक्रम शिनोळी वि. बस्सू जगदाळे
  • पृथ्वीराज पाटील वि. गिरीश चिक्कबागेवाडी
  • पवन चिक्कदिनकोप वि. श्रीनाथ ढेकोळे
  • निखिल कंग्राळी वि. सिद्धू धारवाड
  • विनायक येळ्ळूर वि. राजू गंदीगवाड
  • सुमित कडोली वि. भूमिपुत्र मुतगा
  • हनुमंत गंदिगवाड वि. ओमकार राशिवडे
  • हर्ष कंग्राळी वि. उमेश शिरगुपी
  • सिद्धांत तीर्थकुंडे वि. केशव सांबरा

या मैदानात एकूण ५० हून अधिक कुस्त्या पार पडणार असून, विजेतेपदासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.

महिलांच्या कुस्त्याही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहेत:

  • शिवानी वड्डेबैल वि. वैष्णवी कुसमळी
  • ऋतुजा वडगाव वि. भक्ती मोदेकोप

मेंढ्याची कुस्ती देखील होणार असून त्यामध्ये:

  • पंकज चापगाव वि. रामदास काकती
  • महेश तीर्थकुंडे वि. काशिलिंग जमखंडी

विशेष आकर्षण कुस्त्या:

  • पार्थ पाटील कंग्राळी वि. संजू दावणगिरी
  • प्रथमेश हट्टीकर वि. सुरेश लंगोटी
  • रिदांत मजगाव वि. स्वराज्य सावगाव

या भव्य आखाड्याचे अध्यक्षस्थान आमदार विठ्ठल हलगेकर भूषवणार आहेत. तर उद्घाटन जेडीएसचे नेते नासीर बागवान यांच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रमाला माजी आमदार अरविंद पाटील, भाजप नेते प्रमोद कोचेरी, लैला शुगर्सचे कार्यकारी संचालक सदानंद पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सर्व कुस्तीप्रेमींनी या भव्य कुस्ती महोत्सवाला उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष हणमंत गुरव आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?