खानापूर
शिरोली येथे गोव्याहून पायी आलेल्या वारकऱ्यांचे भक्तिमय स्वागत
महाप्रसाद व निवासाची उत्तम व्यवस्था
शिरोली (ता. खानापूर) :
आज 23 जून संध्याकाळी 6 वाजता श्री संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी मंडळ, कट्टा – केपे, गोवा येथील पंढरपूर वारीला निघालेले 120 वारकरी पायवारी करत शिरोली गावात दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी शिरोली गावातील ग्रामस्थांनी यंदाही मनःपूर्वक तयारी केली होती.

वारकऱ्यांच्या सेवेसाठी गावकऱ्यांनी महाप्रसाद व निवासाची सुंदर सोय केली आहे. तसेच उद्या (मंगळवार) देखील अजून एक पायवारी शिरोली येथे पोहोचणार आहे, याची तयारी देखील तयारी गावकऱ्यांनी केली आहे.

“दरवर्षीप्रमाणे यंदाही शिरोलीमध्ये संतमय वातावरण निर्माण झाले आहे. आम्हाला वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळते, हे आमचं खरं भाग्य आहे,” अशी भावना शिरोली येथील गावकऱ्यांनी व्यक्त केली.