शिंदोळी खुर्द येथे विठ्ठल रुखुमाई मंदिराचा उदघाटन सोहळा

खानापूर: शिंदोळी खुर्द तालुका खानापूर येथे बुधवार दिनांक 25 आणि 26 रोजी श्री विठ्ठल रखुमाई मंदीर उदघाटन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर मंदिर जुने होते त्याचा जिर्णोद्धार करण्याचा संकल्प गावातील सर्व युवावर्ग आणि ग्रामस्थांनी घेतला. जवळजवळ दोन ते अडीच वर्ष झाली मंदिरचे काम चालू होते. शेवटी मंदिराचे काम पूर्णत्वास नेण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गावडू नागोजी गावडा हे होते. आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव सोमान्ना हलगेकर सर यांच्या शुभहस्ते मंदिराचे उदघाटन झाले.

मंदिराचा कलशारोहण हंडी भडंगनाथ कुंभार्डा चे मठाधीश योगी पीर मोहनाथजी यांच्या हस्ते झाला. व्यासपीठावर पंचक्रोशीतील ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य कृषीपतींनचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य . पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते वारकरी व इतर मित्रमंडळी उपस्थित होते. उपस्थितांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. सुरुवातीला जिर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष नारायण फटाण यांनी प्रास्ताविक पर भाषण केले .या कार्यक्रमा प्रसंगी अनेक मान्यवरांची भाषणं झाली. “आपली हिंदूंची मंदिरे ही आपली प्रेरणास्थाने आहेत. ती आपली ईच्छा शक्ती आणि स्फुर्ती वाढवतात. अशा कार्यामुळे गावात एकी नांदते.” असे गौरव उदगार आमदार विठ्ठल हलगेकर करावी काढले.

या उदघाटन व कळस रोहन कार्यक्रमाचे औचित्य साधून गावामध्ये भजनी भारुड ,माहेरवाशीनेचा सत्कार,मडवाळ भजनी मंडळ यांचे हरिपाठ भजन, ह भ प नारायण काळे महाराज आळंदी यांचे निरुपनात्मक कीर्तन झाले. दोन दिवस महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले होते. सदर मंदिराचे काम पूर्णत्वास नेण्यास गावातील ग्रामस्थ जिर्णोद्धार कमिटी व गावातील युवक यांच्या एकजुटीचे सहकार्य लाभले. गावातील युवक जे परगावी उद्योगासाठी आहेत त्यांच्याकडून भरघोस देणग्या व सहकार्य लाभले. अनेक आप्तेष्ट , मित्रमंडळी ग्रामस्थ तसेच मंदिर बांधण्यासाठी विशेष सहकार्य केलेले तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव हलगेकर आणि सामाजिक कार्यकर्ते नासिर अण्णा बागवान यांचे सहकार्य लाभले. सदर या मंदिरामुळे गावाच्या सौंदर्यात तसेच भक्ती मार्गात भर पडली आहे . मंदिराची स्वच्छता व निगा राखण्यास गावातील वारकरी मंडळी विशेष काळजी घेणार आहेत देणगीदारांचे व मंदिर बांधणे प्रोत्साहन व सहकार्य करण्यास हातभार लावणाऱ्या सर्व भक्तांचे व सामाजिक कार्यकर्त्यांचे ग्रामस्थांनी व जिर्णोद्धार कमिटीने आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सर्व युवकांनी आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एम पी गिरी सर यांनी केले.


