आरोग्य

रविवारी उलट्या सोमवारी ताप आणि आज मृत्य, डेंग्यूने घेतला शालेय विद्यार्थिनीचा बळी

खानापूर: बेळगांव जिल्ह्यात सध्या पावसाचे थैमान सुरू आहे. त्याचबरोबर डेंग्यू सारख्या विकारांनी देखील हाहाकार माजवलेला आहे. अनेक ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. यापूर्वी देखील बेळगाव तालुक्यात डेंग्यूचे दोन बळी गेले आहेत. आता होनगा येथे आणखी एका शालेय विद्यार्थिनींचा बळी गेल्यामुळे आरोग्य खात्याच्या तत्परतेबद्दल प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

बेळगाव तालुक्यातील होनगा गावातील प्रणाली परशुराम हुंदरे या १४ वर्षीय मुलीचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. या मुलीला रविवारी दोन वेळा उलट्या झाल्या आणि सोमवारी तिला ताप आला.  प्रणालीच्या कुटुंबीयांनी त्याला मंगळवारीच जिल्हा रुग्णालयात दाखल केले.  मात्र उपचाराचा उपयोग झाला नसल्याने त्या मुलीचा शनिवारी मृत्यू झाला.  या घटनेमुळे होनगा गावावर शोककळा पसरली आहे

death due to dengue in belgavi district

honga girl death

honga belgavi

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते