आरोग्यखानापूर

SBOF तर्फे गावोगावी डेंग्यू लसीकरणाचे आयोजन

खानापूर: तालुक्यातील वाढलेले डेंग्यू रुग्ण पाहता एसबीओएफ SBOF- Savio Fertilizers यांच्या सहकार्याने विश्व हिंदू परिषद बजरंग दल, गांधीनगर हलकर्णी, सद्दाम बडिगेर आणि ख्रिश्चन कम्युनिटीच्या वतीने खानापूरच्या विविध भागात मोफत डेंग्यू लसीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे.

गांधीनगर येथील हनुमान मंदिर तसेच हलकर्णी दुर्गादेवी मंदिर येथे गुरुवार दिनांक 11 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून लस देण्यात येणार आहे.

उर्दू शाळा बशिबाण खानापूर येथे गुरुवार दिनांक 11 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून लस देण्यात येणार आहे.

तसेच खानापूर तालुक्यातील सर्व चर्च मध्ये हे लसीकरण रविवार दिनांक 14 रोजी होणार आहे.

तरी या लसीकरणाचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते