खानापूर

सावरगाळी येथे हत्तीच्या हल्ल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान

खानापूर: खानापूर तालुका अतिजंगलयुक्त असल्याने येथे हत्तींचा वावर सातत्याने होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार पिकांचे नुकसान सहन करावे लागत आहे.  8 दिवसांपूर्वी हत्ती जळगे गावात घुसला होता आणि त्यानंतर मळणीत प्रवेश करून नकळत अनेक ठिकाणी नुकसान केले होते. आता सावरगाळीतील शेतांमध्ये हत्तीने मोठा धुडगूस घातला आहे.

सावरगाळी येथील शेतकरी ज्ञानेश्वर जायाप्पा पाटील यांच्या शेतात हत्तीने मोटार, पाण्याची टाकी आणि उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

या प्रकारामुळे गरीब शेतकरी हताश झाले असून पदरी केवळ निराशाच आहे. सततच्या हत्तीच्या हल्ल्यांमुळे नुकसानग्रस्त शेतकरी नुकसान भरपाईची मागणी करत आहेत. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य ती मदत करावी, अशी विनंती शेतकऱ्यांकडून होत आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते