रूमेवाडी क्रॉसचा तो धोकादायक खड्डा या तरुणांनी मुजवला
खानापूर: दरवर्षी प्रमाणे यंदाही खानापूर तालुका खड्डेमय बनला असून , गावोगावी लोकांना रस्त्यामुळे मोठमोठ्या खड्यांचे त्रास सहन करावे लागत आहेत.
असाच भलामोठा खड्डा रूमेवाडी क्रॉस मुख्य रोडवरील स्पीड ब्रेकर जवळ पडला आहे. रोज तिथे लहान मोठे अपघात घडत आहेत. हे पाहून रुमेवाडी गावातील बजरंग दलाच्या तरुणांनी पुढाकार घेत रातोरात तो खड्डा सिमेंट विटा घालून तात्पुरता मूजवला आहे.

ज्ञानेश्वर एस. बेडरे,नारायण चौगुले, ज्ञानेश्वर बी. बेडरे ,पंकज चौगुले,मनोज कार्लेकर,राजेश घाडी,आकाश घाडी अशी तरुणांची नावे आहे.
निवडणुकीच्या काळात आश्वासने झाली आणि ती हवेत विरली असून लोकप्रतिनधीं अश्या खड्यांकडे कसे काय दुर्लक्ष करतात. असा असाल यावेळी तेथील नागरिकांनी केला.

संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी किंवा ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी तसेच आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी या गोष्टीकडे लक्ष घालावे असे आव्हान नागरिकांनी केले आहे.
