खानापूर

18 वर्षांची प्रतीक्षा संपली! RCB प्रथमच IPL चॅम्पियन

अहमदाबाद: IPL 2025 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) ने पंजाब किंग्ज (PBKS) वर ऐतिहासिक विजय मिळवत आपली पहिलीच IPL ट्रॉफी पटकावली. अहमदाबादच्या मैदानावर हा सामना रंगला आणि RCB ची अखेर 18 वर्षांची प्रतीक्षा संपली.

RCB ने प्रथम फलंदाजी करताना 191 धावा केल्या,   शेवटच्या षटकात, शशांक सिंगने हॅज़लवुडच्या चेंडूवर षटकार ठोकत 184 पूर्ण केल्या पण सहा धावांनि हा सामना RCB ने  जिंकला.

18 वर्षे. एवढा काळ लागला RCB ला IPL जिंकायला. विराट कोहलीसाठी हा खूपच भावनिक क्षण होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. 18व्या वर्षी, 18 नंबरच्या जर्सीत खेळणाऱ्या कोहलीने अखेर स्वप्न सत्यात उतरवलं. त्याच्या आजूबाजूला संपूर्ण संघ होता. कॅमेराचं लक्ष फक्त दोन लोकांवर होतं – कोहली आणि एबी डिव्हिलियर्सवर. डिव्हिलियर्सने IPL ट्रॉफी न जिंकताच कारकीर्द संपवली, पण कोहलीला नशिबाने साथ दिली.

“ई साला कप नामदे” (यंदा कप आपलाच) या घोषणेचं स्वप्न अखेर खरं झालं. बेळगांव बेल्लारीपासून बंगळुरूपर्यंत, मैसूरपासून मांड्यापर्यंत आणि संपूर्ण कर्नाटक तसेच जगभरातील RCB चाहत्यांसाठी हा कधीही न विसरता येणारा क्षण ठरला.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या