खानापूर

रामनगर-जगलबेठ अपघातातील मृत युवक हारुरीचा, तर जखमी वरकडचा

Note: ग्रुप 33 फुल झाल्याने आपण जॉइन होऊ शकणार नाही त्यामुळे ग्रुप 34 जॉइन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.   https://chat.whatsapp.com/LQ5Qsh6R92PB4Gy9hdQL7d

रामनगर:  रामनगर-जगलबेठ रस्त्यावर पेट्रोल पंपाजवळ आज सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या अपघातात खानापूर तालुक्यातील शिरोली येथील युवक जखमी झाल्याची माहिती मिळाली होती. पण ते युवक शिरोली येथील नसून एक युवक हारुरी येथील तर एक वरकड येथील युवक आहे.  या अपघातात दुचाकीस्वार  अनिल संभाजी पाटील वय 25, (हारूरी, खानापूर) याचा जागीच मृत्यू झाला असून पाठीमागे बसलेला ज्योतिबा गडकरी (रा. वरखड, ता. खानापूर) गंभीर जखमी झाला आहे.

बुलेट दुचाकी (क्र. K222 H____) ही खानापूरहून जंगलबेठकडे जात होती, तर समोरून कारवारहून बेळगावकडे जाणारी एसटी बस (क्र. KA31 FC____) येत होती. दगडी खाणीच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्यामुळे दुचाकीस्वाराने खड्डा चुकवण्यासाठी गाडी विरुद्ध दिशेने नेली आणि बसला जोरदार धडक दिली.

अपघातानंतर दोघांनाही 108 रुग्णवाहिकेतून रामनगरच्या सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, अनिल पाटील याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर ज्योतिबा गडकरी याची प्रकृती चिंताजनक असून पुढील उपचारासाठी त्याला बेळगावला हलवण्यात आले आहे.

हा रस्ता दगडी खाणीसाठी वापरला जात असल्याने मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने ये-जा करत असतात. त्यामुळे रस्त्यावर खड्ड्यांची संख्या वाढली आहे. स्थानिक नागरिकांनी या अपघातस्थळी उपस्थित राहून खड्यांमुळे झालेल्या अपघाताबद्दल संताप व्यक्त केला.

या अपघाताची नोंद रामनगर पोलीस स्थानकात झाली असून अधिक तपास सुरू आहे. स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाणे तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करून भविष्यातील अपघात टाळावेत, अशी मागणी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या