खानापूर

बेकवाड गावात महिलांचे गर्भाशय, मासिक पाळी व आरोग्याबद्दल जनजागृती

खानापूर: बेकवाड गावात इनरव्हील क्लबच्या वतीने महिलांच्या  गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग,मासिक पाळीच्या   समस्यांबद्दल जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी श्रीमती रेखा पाटील होत्या. कार्यक्रमाची सुरुवात महिलांच्या स्वागत गीताने झाली.

इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा प्रा. शरयू कदम यांनी क्लबचा परिचय व कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले.  डॉ. संगीता कलमत  यांनी आरोग्यविषयक चर्चेने सुरुवात केली, गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाची कारणे स्पष्ट केली आणि लस आणि तपासणी आणि लवकर शोध याच्या महत्त्वावर जोर दिला. सौ. जयश्री जकाणी यांनी मासिक पाळीच्या काळात कशी काळजी घ्यावी याची माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता बाळेकुंद्री शिक्षिका यांनी केले तर आभार इनरव्हील क्लबच्या सचिव समृद्धी सुळकर यांनी मानले.

या कार्यक्रमासाठी गावातील अंगणवाडी शिक्षिका आशा सेविका व महिलांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या व्यवस्थापक सौ श्रीदेवी जोरापूर यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी गावातील महिला व मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमास शिवाजी पाटील, पंचायत पिडिओ यांचेही सहकार्य लाभले.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते