खानापूर

स्पर्धेचा सराव करताना तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

बेळगुंदी: स्पर्धेचा सराव करत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने बेळगुंदी येथील तरुणाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. १) रोजी घडली. मृत तरुणाचे नाव राहुल नेताजी अनगोळकर (वय 32) असे आहे.



गावात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये शुक्रवार रोजी राहुल हा गावात स्पर्धेसाठी सराव करत होता. यादरम्यान अचानक राहुलची तब्येत बिघडली आणि तो बेशुद्ध पडला. तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी हृदयविकाराचा झटका त्याच्या मृत्यूचे कारण असल्याचे सांगितले आहे.

राहुल हा नेहमीच सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात सक्रिय होता. तो स्थानिक स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घ्यायचा. त्याच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे. राहुलच्या अचानक जाण्याने गावातील अनेकांना धक्का बसला असून त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते