खानापूर

गृहलक्ष्मी योजनेच्या पैशातून गावाला पुरणपोळीचे जेवण

बेळगांव: कर्नाटक सरकारने गृहिणींना मदत म्हणून गृहलक्ष्मी योजना सुरू केली असली तरी एका आजीने स्वतःला मिळालेल्या गृहलक्ष्मी योजनेच्या पैशातून संपूर्ण गावाला पुरणपोळीचे जेवण घातल्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे.

राज्यातील गृहिणी महिलांसाठी दर महिना 2 हजार रुपये देण्याची गृहलक्ष्मी योजना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सुरू केली आहे. या पद्धतीने महिलांचे भले चिंतणाऱ्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना भविष्यात राजकारणात वरचे पद मिळावे याकरिता ग्रामदैवताची पूजा करून आपण संपूर्ण गावाला पुरणपोळीचे जेवण घातल्याचे आक्काताई लंगोटी राहणार सुतट्टी (ता. रायबाग जि. बेळगाव) यांनी सांगितले.

अक्काताई लंगोटी या आजीने गृहलक्ष्मी योजनेतून मिळालेल्या पैशातून संपूर्ण गावाला जेवण दिले आहे. इतके करून न थांबता या आजींनी पाच सुहसिनिंची ओटी भरून काही महिलांना भेटवस्तू सुद्धा दिल्या आहेत. गावातील मंदिरात पूजा अर्चा देखील केली आहे. यामुळे तिने स्वतःला मिळालेले पैसे गावासाठी खर्च केल्याने तिची चर्चा सर्वत्र होत आहे.

Karnataka gruhlaxmi money

gruhlaxmi money distribution date

o

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते