खानापूर
पुराच्या पाण्यात पडून वृद्ध महिलेचा मृत्यू
बेळगाव : बेळगाव येथील अमन नगरमध्ये मुसळधार पावसाने घरांमध्ये पाणी शिरले आहे. या दुर्दैवी घटनेत एक वृद्ध महिलेचा साचलेल्या पाण्यात पाय घसरून मृत्यू झाला.

महबूबी आदम साहेब मकानदार (वय 79) असे वृध्द महिलेचे नाव आहे. संततधार पावसामुळे या भागात ड्रेनेजचे पाणी साचल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. मृतदेह बाहेर काढण्यासाठी कुटुंबीयांनी प्रचंड धडपड केली. त्यामुळे गुडघाभर पाण्यातून मृतदेह उचलून नेण्यात नागरिकांना मोठी अडचण झाली.
