जांबोटी विद्यालयात मानसिक आरोग्य मार्गदर्शनाचा उपक्रम

जांबोटी, खानापूर:
इनरव्हील क्लब, खानापूरच्या वतीने जांबोटी येथील माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्यविषयक मार्गदर्शन पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागतगीताने झाली.

कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा प्रा. शरयू कदम, व्याख्यात्या सौ. पूजा गुरव, विदुला मणेरीकर आणि अश्विनी पवार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक मुख्याध्यापक महेश सडेकर यांनी केले.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना सौ. पूजा गुरव म्हणाल्या, “विद्यार्थ्यांनी केवळ शारीरिक आरोग्यच नाही तर मानसिक आरोग्यही टिकवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी संतुलित आणि पोषक आहार घेणे, नियमित व्यायाम व योगासन करणे, तसेच मोबाईलचा अतिरेक टाळून अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.”
प्रा. शरयू कदम यांनी देखील विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण टिप्स देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सुजाता चलवेटकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संपदा तिरवीर यांनी मानले.
कार्यक्रमाला इनरव्हील क्लबच्या समृद्धी सुळकर, वर्षा देसाई, साधना पाटील, मधू हेरेकर, माधुरी खानापुरी, नमिता उप्पीन तसेच विद्यालयाचे शिक्षकवर्ग उपस्थित होते.


