बातम्या

पावसाने जंगल भागातील ग्रामस्थांना टाकले अंधारात


खानापूर : गेल्या महिन्याभरापासून देगाव-हेमाडगा व कणकुंबी व आजूबाजूच्या गावातील नागरिक काळोखात  आहेत. खानापूर तालुक्यातील जंगल भागात मुसळधार पाऊस , झाडांची पडझड आणि वादळी हवामानामुळे वीज पुरवठा खंडित आहे.



हेम्माडगा, गवाळी, कोंगळा, आस्टोली, अबणाळी, डोंगरगाव, पाली, देगाव व चोर्ला कणकुंबी भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे. त्यात वन्यजीवांच्या हल्ल्याचा धोका ही शिगेला पोहोचला आहे. पुलावर आलेले पाणी कोसळलेली झाडे आणि तुटलेले रस्ते यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.

खानापूरवार्ता शी बोलताना देगाव चे ग्रामस्थ आनंद गावडा म्हणाले त्यांच्या गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. पावसाळ्याच्या दिवसातील ‘वीजप्रश्न’, मात्र आजतागायत सुटलेला नाही.

मुसळधार पावसामुळे खानापूरच्या जंगलातील अनेक गावांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला आहे. गावडा म्हणाले,  ना गावातील विद्यार्थी शाळा कॉलेज ला जाऊ शकतात, ना त्यांना अभ्यास करता येतो.

हेस्कॉमशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ज्या गावांना वीजपुरवठा खंडित होत आहे, ती गावे घनदाट जंगलात वसली असून तेथे मुसळधार पाऊस पडत आहे. ज्या भागात विजेची वायर तुटते, त्या भागात झाडे कोसळणे हे नेहमीचेच आहे. त्या गावांचा वीजपुरवठा सुरळीत करणे अवघड जात आहे.

power cut in khanapur taluka village’s ,  powercut in hemmadaga , powercut in jamboti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते