बातम्या

कर्नाटक: मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई, पोलिसांकडून तपासणी

बेंगळूर: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रात मोबाईल फोन नेण्यास सक्त मनाई केली आहे. मतदानावेळी मोबाईल, डिजिटल डिव्हाईस,वायरलेस सेट व स्मार्टवाच वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

कर्नाटक मुख्य निवडणूक अधिकारी Chief Electoral Officer (CEO) यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या निवडणुकीत बूथ कक्षात मोबाईल वापरावर बंदी आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले कि मतदान बूथ मध्ये जाणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी केली जाईल आणि त्यानंतरच त्यांना आत सोडले जाईल. बूथ बाहेर मोबाईल ठेवण्यासाठी विशेष जागेची सोय करण्यात येईल. यामुळे मतदारांना यामध्ये आपला फोन ठेवता येईल. मोबाईलची देखरेख पोलीस किवा तेथील अधिकारी करतील.

मागील निवडणुकीत देखील हा निर्णय घेण्यात आला होता पण विविध कारणामुळे लोक आपले फोन वापरत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. मागील निवडणुकांचा इतिहास पाहता लोक मतदान करताना फोटो आणि व्हिडीओ काढताना अनेक वेळा पकडले गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी किवा तेथील निवडणूक अधिकाऱ्यांनी टेबलवर एक बॉक्स किवा ट्रे ठेऊन मतदान वेळेसाठी मोबाईलची देखरेख करावी असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

मतदारांच्या मतामध्ये कोणतेही हस्तक्षेप होऊ शकतात. तसेच निवडणूक प्रक्रियेतील चुकीचे प्रकार रोखण्यासाठी मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर ईसीआय च्या म्हणण्यानुसार वायरलेस सेट स्मार्टवाच व इतर डिजिटल डिव्हाईस मतदानावेळी नेण्यास बंदी आहे.

ते पुढे म्हणाले बूथ वर फोन नेऊ नका असे आम्ही म्हणत नाही पण मतदानावेळी त्याचा वापर करू नका असे आमचे म्हणणे आहे. चोरून व्हीडीओ किवा फोटो काढल्यास कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले, यावेळी कर्नाटक मुख्य कार्यकारी अधिकारी, उपायुक्त आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते