खानापूर

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, बेळगांव अधिवेशन सभा रद्द

भारताचे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे 92 व्या वर्षी निधन झाले आहे. आज अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने देशात शोककळा पसरली आहे.

डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबच्या गाह (सध्याचा पाकिस्तानातील पंजाब) येथे झाला. ते देशाचे 14 वे पंतप्रधान होते. अर्थशास्त्रात उच्चशिक्षित असलेल्या मनमोहन सिंह यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठांमधून शिक्षण घेतले. प्राध्यापक, अर्थमंत्री, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, आणि योजना आयोगाचे उपाध्यक्ष अशा विविध महत्त्वाच्या भूमिकांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

आरोग्याच्या समस्यांमुळे निधन
डॉ. सिंह यांना श्वसनास त्रास होत असल्याने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यांच्यावर ऑक्सिजन सपोर्टवर उपचार सुरू होते, मात्र प्रकृतीत सुधारणा होऊ शकली नाही.

काँग्रेस नेत्यांकडून श्रद्धांजली
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांनी एम्स रुग्णालयाला भेट दिली. तसेच काँग्रेसच्या बेळगावमधील सभा रद्द करण्यात आली असून, राहुल गांधी तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.

पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. सिंह यांच्या कुटुंबीयांना फोन करून सांत्वन व्यक्त केले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि अनेक दिग्गज नेत्यांनी रुग्णालयात जाऊन श्रद्धांजली वाहिली आहे.

डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाने देश एका महान अर्थशास्त्रज्ञ आणि प्रामाणिक नेत्याला मुकले आहे. त्यांच्या योगदानाची आठवण देशवासीयांच्या मनात कायम राहील.

काँग्रेसची बेळगावमधील सभा रद्द, राहुल गांधी दिल्लीच्या दिशेला रवाना
काँग्रेसची उद्या बेळगावात मोठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी हे बेळगावात गेले होते. पण मनमोहन सिंह यांचं निधन झाल्याची माहिती समोर आल्यानंतर ते दिल्लीच्या दिशेला रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते