खानापूर
बेळगाव: कुंभमेळ्यातील चार मृत्यू , अरुण कोरपडे आणि भाजप कार्यकर्त्या महादेवी यांचा देखील मृत्यू
बेळगाव: प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या दुर्घटनेत बेळगाव येथील आई-मुलगी आणि आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. वडगाव येथील रहिवासी ज्योती हत्तरवाड(50), मेघा हत्तरवाड आणि अरुण कोरपडे आणि जखमी महादेवी यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या चेंगराचेंगरीत बेळगाव येथील अनेक जण बेपत्ता झाले असून सध्या मृतांची संख्या चारवर पोहोचली आहे.



