खानापूर तालुका वारकरी सांप्रदायिक संस्थेच्या वतीने होनकल येथे विद्याभवन
खानापूर (प्रतिनिधी) : श्रीमंत ब्रह्मचैतन्य सद्गुरु वै. तात्यासाहेब बाबासाहेब वासकर महाराज पंढरपूर यांच्या कृपाशीर्वादाने आणि ह. भ. प. सद्गुरु विठ्ठल (दादासाहेब) तात्यासाहेब वासकर महाराज पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर तालुका वारकरी सांप्रदायिक शिक्षण संस्था, श्री सिद्ध दत्त मंदिर होनकल संचालित श्री ज्ञानेश्वर माऊली विद्याभवन वास्तूच्या कॉलम भरणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम बुधवार, दि. 14 मे 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता होणार असून, भक्तिभावाने व उत्साहात कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमासाठी श्रीमंत चैतन्य जगतगुरु तात्यासाहेब आबासाहेब वासकर महाराज, पंढरपूर व चैतन्य जगतगुरु आप्पासाहेब वासकर महाराज, पंढरपूर यांचे विशेष कृपाशीर्वाद लाभले असून, या कार्यक्रमासाठी खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील आणि क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सर्व वारकरी, पालक व ग्रामस्थांनी या पावन सोहळ्यास उपस्थित राहून अध्यात्मिक व सांस्कृतिक वातावरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.