खानापूर
खानापूर स्वामी समर्थ सेवा केंद्रात सरस्वती बीज मंत्र लेखन सोहळा
खानापूर: अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा, आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) शाखा: खानापूर येथे विशेष कार्यक्रम

सद्गुरु प.पु. गुरुमाऊली यांच्या कृपाशीर्वादाने *बालसंस्कार विभाग अंतर्गत* माघ शुक्ल पंचमी, रविवार, 2 फेब्रुवारी 2025 रोजी *वसंत पंचमी* निमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सरस्वती मातेची सेवा करण्यात आली तसेच उपस्थित बालसेवेकऱ्यांच्या जिभेवर *ऐं* हा सरस्वती बीज मंत्र लिहण्यात आला.
कार्यक्रमात बालसेवेकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
