खानापूर

खानापूर तालुक्यातून नंदगडची रोहिणी अव्वल – 625 पैकी 624 गुण

खानापूर: दहावी परीक्षेचा निकाल आज दुपारी जाहीर झाला.   यंदा खानापूर तालुक्याचा निकाल 61.2% टक्के लागला आहे. या परीक्षेत खानापूर तालुक्यातील नंदगड संगोळी रायान्ना मेमोरियल रेसिडेन्सी स्कूल या शाळेची विद्यार्थिनी रोहिणी सिद्धू पटोले हिने उल्लेखनीय यश मिळवले आहे. रोहिणीने 625 पैकी 624 गुण, म्हणजेच 99.84 टक्के गुण मिळवत खानापूर तालुक्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे.

तर दुसऱ्या नंबरवर लोंढा इंग्लिश मॉडेल स्कूल शाळेतील क्षमा हेगडे हिने 625 पैकी 621 गुण मिळवले आहेत. तर 619 गुण मिळवत बिडी होली स्कूल येथील राहिणीबानू हि तिसऱ्या नंबरवर आहे.

या शानदार यशाबद्दल खानापूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातून तसेच गट शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून सर्वांचे अभिनंदन करण्यात येत आहे.  हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

खानापूरवार्ता कडून विद्यार्थ्यांना शिक्षक-पालकांना मनःपूर्वक शुभेच्छा!

कर्नाटकमधील SSLC निकाल 2025 कसा पाहाल?

विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे स्टेप्स फॉलो कराव्यात:

  1. अधिकृत संकेतस्थळ karresults.nic.in ला भेट द्या
  2. होमपेजवर ‘SSLC Result 2025’ या लिंकवर क्लिक करा
  3. आपला रोल नंबर आणि जन्मतारीख टाका
  4. निकाल पाहा आणि मार्कशीट डाउनलोड करा
  5. भविष्यासाठी प्रिंटआउट घेऊन ठेवा

ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಅಗ್ರಗಣ್ಯತೆ: ನಂದಗಡದ ರೋಹಿಣಿ ಪಟೋಳೆಗೆ 99.84% ಅಂಕಗಳು!

ಸುದ್ದಿ:
ಖಾನಾಪುರ / ಪ್ರತಿನಿಧಿ:
SSLC (10ನೇ ತರಗತಿ) ಪರೀಕ್ಷೆಯ ಫಲಿತಾಂಶ ಇಂದು ಮಧ್ಯಾಹ್ನ ಪ್ರಕಟವಾಗಿದ್ದು, ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿ ಗಮನ ಸೆಳೆದಿದ್ದಾಳೆ. ನಂದಗಡದ ಸಂಗೋಳಿ ರಾಯಣ್ಣ ಮೆಮೋರಿಯಲ್ ರೆಸಿಡೆನ್ಸಿ ಶಾಲೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿ ರೋಹಿಣಿ ಸಿದ್ದು ಪಟೋಳೆ SSLC ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ 625ಕ್ಕೆ 624 ಅಂಕಗಳನ್ನು ಪಡೆದು 99.84% ಶೇಕಡಾ ಫಲಿತಾಂಶ ಸಾಧಿಸಿದ್ದಾರೆ.

ರೋಹಿಣಿಯ ಈ ಸಾಧನೆಯಿಂದ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಮೊದಲ ಸ್ಥಾನ ಪಡೆದಿದ್ದು, ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿ ಮತ್ತು ಶಾಲೆಯ ಹೆಮ್ಮೆಯ ವಿಷಯವಾಗಿದೆ. ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕು ಹಾಗೂ ಸಮೂಹ ಶಿಕ್ಷಣಾಧಿಕಾರಿ ಕಚೇರಿಯಿಂದ ರೋಹಿಣಿಗೆ ಅಭಿನಂದನೆಗಳು ವ್ಯಕ್ತವಾಗಿವೆ.

ಅವಳ ಪರಿಶ್ರಮ, ಶಿಕ್ಷಕರ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮತ್ತು ಪಾಲಕರ ಬೆಂಬಲ ಈ ಸಾಧನೆಯ ಪ್ರಮುಖ ಹಂತಗಳಾಗಿವೆ. ಇಂತಹ ಪ್ರತಿಭಾಶಾಲಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯ ಸಾಧನೆ ಇತರರಿಗೆ ಪ್ರೇರಣೆಯಾಗಲಿ ಎಂಬ ಆಶಯ ವ್ಯಕ್ತವಾಗಿದೆ.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या