खानापूर

शिवजयंती उत्साहात साजरी – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण

खानापूर: आज शिवजयंती निमित्त शिवस्मारक, खानापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आणि अन्य मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी शिवरायांच्या नावाने जयघोष करण्यात आला आणि महाराजांच्या शौर्याचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला अनेक मान्यवर आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यामध्ये महांतेश राऊत, महादेव कोळी, सुरेश भाऊ, प्रकाश चव्हाण साहेब, देमान्ना बसरीकट्टी, प्रसाद पाटील (गुड्डू टेकडी), अभिषेक शहापूरकर, भरतेश तोरोजी, इसाक पठान, साईश सुतार, विवेक तडकोड, प्रशांत पाटील, लक्ष्मण मादार, विवेक गिरी, जगन्नाथ बिरजे, राजू कुडाळे, राजू कांबळे, आबासाहेब दळवी साहेब, धनंजय देसाई, हणमंत सोनटक्के, अनंत मादार यांचा समावेश होता.

शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची आठवण काढून, उपस्थितांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. जय भवानी! जय शिवाजी! च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते