खानापूर
पत्रकार पिराजी कुराडे यांना पितृशोक
खानापूर: चापगाव येथील प्रतिष्ठित नागरिक व खानापूर तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष, खानापूर लाईव्ह चे संपादक, तथा तालुका विजय वाणीचे तालुका पत्रकार पिराजी कुऱ्हाडे यांचे वडील श्री मष्णू हनमंत कुऱ्हाडे वय 78 यांची अल्पशा आजाराने मंगळवारी सकाळी 9.45 वाजता निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन कर्ते चिरंजीव, विवाहित मुलगी सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी 8 वाजता होणार आहे. अंत्यसंस्कार दुपारी 2.30 पर्यंत होणार आहे.
खानापूर वार्ता टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली 💐
