खानापूर

खानापूर पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना निलंबनाचा धक्का; सी.टी.रवी प्रकरणाचा फटका

खानापूर:  पोलिस स्थानकाचे निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना निलंबित करण्यात आल्याचे आदेश उत्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक विकासकुमार विकास यांनी दिले आहेत. भाजप आमदार सी.टी.रवी यांच्या अटक प्रकरणात दाखवलेल्या हलगर्जीपणामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

प्रकरणाचा आधार

गुरुवारी (ता. १९) हिरेबागेवाडी येथून सी.टी.रवी यांना खानापूर पोलिस स्थानकात आणण्यात आले होते. त्या वेळी पोलिस स्थानकात योग्य बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश मंजुनाथ नाईक यांना दिले होते. मात्र, त्यांनी या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याने स्थानकात गोंधळ निर्माण झाला. कायदा आणि सुव्यवस्थेच्या हाताळणीतील अपयशामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

नाईक यांची वादग्रस्त भूमिका

मंजुनाथ नाईक यांची वर्तणूक ही नेहमीच चर्चेत राहिली होती. सी.टी.रवी यांना अटक झाल्यानंतरही नाईक यांनी त्यांच्याशी सौजन्यपूर्ण वागणूक दाखवली. भाजप नेत्यांना ‘व्ही.आय.पी.’ ट्रीटमेंट देण्यात कोणतीच कसर न सोडल्याचेही त्यांच्यावर आरोप आहेत. या वागणुकीमुळे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक स्तरावर संताप व्यक्त केला जात होता.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची दखल

नाईक यांच्याबाबत खानापूर तालुक्यातून अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. विशेषतः लॉजवरील छाप्याप्रकरणात त्यांची भूमिकाही संशयास्पद ठरली होती. या तक्रारींची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाईक यांची प्रत्यक्ष वर्तणूक पाहून ही कठोर कारवाई केली आहे.

पोलिस दलात खळबळ

मंजुनाथ नाईक यांच्या निलंबनामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. त्यांच्या निलंबनामुळे तीन स्टारचा सन्मान गमवावा लागल्याने स्थानिक पातळीवर या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते