खानापूर

त्या बातमीची आमदारांनी घेतली दखल, तातडीने दोन लाख रुपयांचे अनुदान मंजूर

खानापूर: तालुक्यातील केरवाडा ग्रामपंचायत हद्दीतील हिडकल गावातील (अंजनेय नगर) रस्त्यावरील खराब झालेल्या रस्त्यातून लहान मुले गुडघाभर चिखलातून आपला गणवेश आणि दप्तर सावरत, पायपीट करत जातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या समस्येची दखल घेत आज आमदार विठ्ठल सोमण्णा हलगेकर यांनी घटनास्थळी भेट दिली.

आमदार विठ्ठल सोमण्णा हलगेकर यांनी पाहणी करून पाऊस संपेपर्यंत तात्पुरत्या दुरुस्तीसाठी तातडीने दोन लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले व आता काम सुरू करून काही दिवसात चांगला रस्ता बनवणार असल्याने आश्वासन दिले. यावेळी त्यांनी अंजनेयनगर येथे पहिली ते पाचवीसाठी नवीन शाळा सुरू करण्याचेहि आश्वासन दिले.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजपचे जिल्हा सचिव सुनील मड्डीमणी, भाजप मंडल उपाध्यक्ष संतोष हडपड, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख सिद्दू पाटील, भाजप नेते, कर्नाटक रक्षण वेदिकेचे तालुका सरचिटणीस विठ्ठल हिंदळकर, गावातील वयोवृद्ध, एसडीएमसी प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते