खानापूर

खानापूरमध्ये तिसरी कारगिल ओपन मॅरेथॉन; धावपटूंना मोफत प्रवेश

खानापूर: मौजे अबनाळी येथे विश्वभारती कला क्रीडा संघटनेच्या वतीने तिसऱ्या कारगिल ओपन मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दिनांक ०१ जून २०२५ रोजी सकाळी ठीक ७ वाजता होणार आहे.
या गटनिहाय मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या धावपटूंसाठी प्रवेश विनामूल्य आहे. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक सन्मानचिन्ह, पदक आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.


या स्पर्धेत विविध गटांमध्ये धावण्याची शर्यत आयोजित केली आहे, ज्यात १८ वर्षांवरील महिला व पुरुष (८ किलोमीटर), ३५ वर्षांवरील महिला व पुरुष (८ किलोमीटर), तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी २०० मीटर, ४०० मीटर, ८०० मीटर धावण्याच्या शर्यतींचा समावेश आहे. लहान मुलांसाठी २५ मीटर आणि ५० मीटर धावण्याची स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली आहे.
आयोजकांनी सांगितले की, लहान मुलांना शिक्षणासोबत खेळाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने या मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. यापूर्वी संघटनेने दुर्गम भागात जनजागृती सभा आणि विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. याच उद्देशाने यावर्षी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शहरांपर्यंत न येता त्यांच्याच भागात स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळावी म्हणून मोफत मॅरेथॉन आयोजित केली आहे.
या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी विश्वभारती कला क्रीडा संघटना, अबनाली यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या