कुपटगिरी येथे ज्ञानदिंडीचे आयोजन
खानापूर: कुपटगिरी येथील मराठी प्राथमिक शाळेत खानापूर येथील इनरव्हील क्लब च्या माध्यमातून कामीका एकादशीचे औचित्य साधून ज्ञान दिंडीचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वंदना पाटील होत्या. प्रमुख अतिथी म्हणून इनरव्हील क्लब च्या अध्यक्षा प्राचार्या. शरयू कदम, सेक्रेटरी समृद्धी सुळकर उपस्थित होत्या.

कार्यकमाची सुरुवात शाळेतील विद्यार्थ्यांनी ज्ञान दिंडीने केली…दिंडीत शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या व्यक्तीरेखा साकारल्या. अभंग, भजन सादर केले.इंनरव्हील च्या माध्यमातून सौ नमिता उप्पीन आणि स्मिता देऊळकर यांनी भक्तीगीत सादर केले.क्लब च्या अध्यक्षा प्रा. शरयू कदम यांनी क्लब चे सामाजिक, शैक्षणिक कार्य तसेच संतांच्या जीवनावर ज्ञानदिंडी चे महत्व पटवून दिले.
त्यानंतर सामान्यज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेऊन विजेत्यांना बक्षीस प्रदान केले. क्लबच्या माध्यमातून शाळेला भेटवस्तू दिली.
सदर कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक श्री.एस एस हिरेमठ,श्री एन बी कुपटगिरी, एस वाय कुंडेकर, तसेच इंनरव्हील क्लब चे सर्व पदाधिकारी,एस डी एम सी पदाधिकारी,गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.व्ही एस कदम तर आभार सौ. सी. पी. पाटील यांनी केले..
