खानापूरच्या धबधब्यांवर पर्यटकांना ‘नो एंट्री’; सोशल मीडियासाठी जीव धोक्यात घालू नका ಖಾನಾಪುರ ಅರಣ್ಯದಲ್ಲು ಪ್ರವಾಸ ಕಠಿಣವಾಗಿ ನಿಷಿದ್ಧ
पावसाळ्यात खानापूरच्या जंगलात पर्यटकांना प्रवेशबंदी; सोशल मीडियावर व्हायरल झाल्यास होणार कठोर कारवाई
खानापूर: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यातील निसर्गरम्य वनक्षेत्रे आणि धबधब्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांवर वन विभागाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. सुरक्षिततेचा धोका आणि वन्यजीवांच्या हालचालींमध्ये अडथळा निर्माण होऊ नये यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. विशेषतः सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो टाकून प्रसिद्धी मिळवू पाहणाऱ्या तरुणाईला यापुढे गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे.
बेळगाव, गोवा आणि आसपासच्या भागांतून पर्यटक मोठ्या प्रमाणात खानापूर तालुक्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागातील धबधब्यांकडे आकर्षित होतात. परंतु ही ठिकाणे बिबट्या, वाघ यांसारख्या वन्य प्राण्यांच्या अधिवासातील संरक्षित क्षेत्रात येतात. मुसळधार पावसामुळे रस्ते निसरडे होतात, दृश्यमानता कमी होते आणि अपघाताची शक्यता वाढते.
अलीकडेच काही युवकांनी तपासणी नाके चुकवून वज्रपोहा धबधब्यावर चित्रीकरण केले आणि त्यांच्या व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. यानंतर वन विभागाने संबंधित तरुणांना ताब्यात घेऊन जाब विचारला. त्यांना समज देण्यात आली आणि पालकांना बोलावून घेतल्यानंतरच त्यांची सुटका करण्यात आली.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्याच्या काळात भीमगड वन्यजीव अभयारण्यासारख्या संवेदनशील भागांमध्ये प्रवेश पूर्णतः बंद करण्यात आला आहे. चेकपोइंट्स आणि गस्त वाढवण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
पर्यटकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आपली आणि पर्यावरणाची सुरक्षितता जपावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.
ಖಾನಾಪುರ ಅರಣ್ಯದಲ್ಲು ಪ್ರವಾಸ ಕಠಿಣವಾಗಿ ನಿಷಿದ್ಧ
ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಅರಣ್ಯ ಪ್ರದೇಶಗಳು ಮತ್ತು ಜಲಪಾತಗಳಿಗೆ ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಪ್ರವಾಸಿಗರಿಗೆ ಪ್ರವೇಶವನ್ನು ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆ ನಿಷೇಧಿಸಿದೆ. ಸುರಕ್ಷತೆ ಮತ್ತು ಕಾಡುಪ್ರಾಣಿಗಳ ಹಿತವನ್ನು ಗಮನದಲ್ಲಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಈ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಸೋಶಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾದಲ್ಲಿ ವೈರಲ್ ಆಗುವಂತೆ ವೀಡಿಯೋ ಶೂಟ್ ಮಾಡಿದ ಯುವಕರನ್ನು ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ, ಪೋಷಕರಿಗೆ ಕರೆದು ಕಟ್ಟುನಿಟ್ಟಾಗಿ ಎಚ್ಚರಿಸಲಾಗಿದೆ. ನಿಯಮ ಉಲ್ಲಂಘಿಸಿದರೆ ಕಾನೂನು ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಲಾಗುತ್ತದೆ ಎಂದು ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀಡಿದೆ.