खानापूर

खानापूरमध्ये २१ जूनपासून इंदिरा कॅन्टीन सुरू

खानापूरकरांसाठी दिलासादायक बातमी – इंदिरा कॅन्टीनचा शुभारंभ २१ जून रोजी

खानापूर : शहरातील नागरिकांसाठी स्वस्त दरात सकस अन्न उपलब्ध करून देणारी इंदिरा कॅन्टीन लवकरच कार्यान्वित होणार आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवस्मारक चौकात उभारण्यात आलेली ही कॅन्टीन शनिवार, २१ जून रोजी दुपारी १२ वाजता उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

या कॅन्टीनचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते होणार असून, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर असतील.

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी इंदिरा कॅन्टीन योजनेचा एक भाग म्हणून खानापूरमध्ये ही सुविधा सुरू होत आहे. या योजनेअंतर्गत गोरगरीब, मजूर, विद्यार्थी आणि गरजू व्यक्तींना अत्यल्प दरात सकस अन्न मिळणार आहे.

कॅन्टीनची उभारणी खानापूर तालुका हॉस्पिटलच्या आवारात, मॉडेल रिक्षा स्टॅण्डच्या बाजूला करण्यात आली आहे. ही योजना राज्य सरकार आणि नगरपंचायत यांच्या संयुक्त सहकार्याने राबवली जाणार आहे.

या कॅन्टीनमधून दररोज:

  • १० रुपयांत सकस नाश्ता
  • १५ रुपयांत गरम जेवण

अशी स्वस्त दरातील अन्नसुविधा उपलब्ध होणार आहे. खानापूर शहरात ही सुविधा उपलब्ध होत असल्याने नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे. गरजूंकरिता ही योजना उपयुक्त ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या