खानापुरातील वसतिगृह प्रवेशासाठी अर्जाचे आवाहन
खानापूर (प्रतिनिधी) – समाज कल्याण विभागाच्या वतीने खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे.
तालुक्यात सध्या तीन वसतिगृहे कार्यरत आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्री-मॅट्रिक मुलांचे वसतिगृह, मुलींचे वसतिगृह आणि मुलांचे वसतिगृह. हे वसतिगृहे खानापूरमध्ये आहेत आणि पाचवी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहेत.
इच्छुक विद्यार्थ्यांनी sw.kar.nic.in (HMIS) या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे खानापूर तालुका समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात किंवा संबंधित वसतिगृहांच्या पर्यवेक्षकांकडे सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.