खानापूर

आई-वडिलांशी वाद, तरुणाची आत्महत्या

हलकर्णी (ता. खानापूर) :
मारुती गल्लीत राहणाऱ्या १९ वर्षीय प्रतीक राजू चुरमुरी या तरुणाने शनिवारी (११ मे) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

प्राप्त माहितीनुसार, प्रतीक आपल्या आई-वडिलांना रोजंदारीवर काम करत असताना मदत करत असे. मात्र काही दिवसांपासून तो कामावर जात नव्हता. त्यामुळे त्याचे आई-वडिलांशी किरकोळ वाद झाले होते. आई-वडिलांचे बोलणे मनावर घेऊन त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते.

घटनेच्या वेळी घरात कोणीही नसताना त्याने गळफास घेतला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. या प्रकरणाची नोंद खानापूर पोलिस ठाण्यात झाली आहे.

Back to top button
error: Content is protected !!
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?