खानापूर

माणसे मेली तरी चालतील पण कोंबड्या जगल्या पाहीजेत? खानापुर काँग्रेसचा धडक मोर्चा

खानापुर (बैलुर): कौलापूरवाड्याच्या 200 मीटर च्या आत असणाऱ्या क्वालिटी पोल्ट्री मुळे लोकांच्या आरोग्य बिघडत असल्याने  तालुक़ा प्रशासनास जाब विचारत आज खानापूर ब्लॉक कॉंग्रेस तर्फे धडक मोर्चा काढण्याचा आला.

यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष कोळी म्हणाले “माणसे मेली तरी चालतील पण कोंबड्या जगल्या पाहीजेत???” गेली 15 वर्ष  क्वालिटी पोल्ट्री फॉर्मचा त्रास कौलापूरवाडा नागरीक सहन करत आहेत. व तालुका अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत.

कौलापूरवाड्यातील जनतेने  वारंवार अर्ज निदर्शने करून देखील खानापूर तालुक्यातील अधिकारी वर्ग मात्र क्वालिटी वाल्यांना वेळ देण्याची भाषा करतं आहेत.

ग्रामपंचायत बैलूर यांनी सुद्धा या पोल्ट्री विरोधात ठराव मंजूर करून दिला आहे. खानापूरच्या तहसिलदारांनी ही पोल्ट्री बंद करण्यासंदर्भात नोटीफिकेशन काढले आहे, असे असतांना आता वेळ काढूपणा  कशासाठी ? असा प्रश्न यावेळी खानापूर कॉंग्रेसने तालुक़ा प्रशासनास केला.

ग्रामपंचायत बैलूर यांनी सुद्धा या पोल्ट्री विरोधात ठराव मंजूर करून दिला आहे. खानापूरच्या तहसिलदारांनी ही पोल्ट्री बंद करण्यासंदर्भात नोटीफिकेशन काढले आहे, असे असतांना आता वेळ काढूपणा  कशासाठी ? असा प्रश्न यावेळी खानापूर कॉंग्रेसने तालुक़ा प्रशासनास केला.

येत्या तीन दिवसात तालुका अधिकाऱयांनी क्वालिटी पोल्ट्री फॉर्मच्या मालकाला पोल्ट्री फार्मच्या मालकाला नोटीस देऊण पोल्ट्री बंद करा.अन्यथा इतरत्र हालवा. अशी मागणी केली.

यावेळी खानापूर तालुका ब्लॉक अध्यक्ष महादेव कोळी, अँड.ईश्वर घाडी, कॉंग्रेस नेते सुरेश जाधव, विनायक मुतगेकर, तोहिद चाखंदन्नावर, राजेश पाटील, सुरेश दंडगल, सावित्री मादार, भारती पाटील,अनिता दंडगल व कौलापूरवाडा गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Khanapur Congress news

khanapur news Belgavi

khanapur Congress

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते