खानापूर

अमित शहांच्या बाबासाहेबांवरील अवमानकारक वक्तव्याचा खानापूर काँग्रेसने केला निषेध

खानापूर: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा विरोध खानापूर काँग्रेसने आज जोरदार निषेध केला. शिवस्मारक चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शनं केली आणि तहशिलदारांना निवेदन सादर केले. निवेदनात शहांना तात्काळ मंत्रीपदावरून पायउतार करण्याची मागणी करण्यात आली.

शहा यांनी डॉ. बाबासाहेबांचे नाव घेणे फॅशन बनल्याचे वक्तव्य केल्यानंतर, त्यावर सर्वत्र निषेध सुरू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आज (ता. १९) शिवस्मारक चौकात शहांच्या प्रतिकृतीला चप्पने मारून जाळण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी टायर पेटवून जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलकांना अडविण्याचा प्रयत्न केला, पण आंदोलन थांबवता आले नाही.

नंतर, आंदोलनकर्त्यांनी ‘अमित शहा मुर्दाबाद, अमित शहांचा धिक्कार, अमित शहा राजिनामा द्या’ अशा घोषणा देत तहशिलदार कार्यालयाचा रस्ता पकडला. यावेळी ब्लॉकचे अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी यांनी सांगितले, “भाजपची भूमिका नेहमीच संविधान विरोधी राहिली आहे. गृहमंत्र्यांनी डॉ. बाबासाहेबांबाबत केलेले वक्तव्य त्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचे प्रतीक आहे. त्यांचा निषेध करत असून त्यांनी तात्काळ राजिनामा द्यावा.”

नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी यावेळी म्हटले, “अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेबांचा अपमान केला आहे. भाजपने मनुवादाला चालना देत संविधान नाकारण्याचा प्रयत्न केला आहे. सध्याचे केंद्र सरकार हे मनुवादी असल्याचे शहा यांनी दाखवून दिले आहे. आम्हाला देव-देवतांपेक्षा डॉ. बाबासाहेब अधिक पुजनीय आहेत. शहांना तात्काळ मंत्रीपदावरून पायउतार करा, अन्यथा भाजपला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.”

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते